एकांकिका : दीर्घांक
लेखिका : सौ अल्पना लेले





पात्र परिचय
ललिता : एक चाळीशीतील सुस्वरूप स्त्री . अतिशय स्मार्ट आणि फॅशनेबल अभिनेत्री किंवा डान्सर शोभेल अशी
            अतिशय उच्चभ्रू .
प्रिया : ललिताची सेक्रेटरी.. अतिशय स्मार्ट आणि फॅशनेबल अशी तिशीतली तरुणी . सुशिक्षित , वेल mannered

अविनाश : साधारण साठीतला पण अजूनही देखणा असा पुरुष.. परदेशी स्थायिक झालेला ....सुशिक्षित















पडदा वर जातो तेव्हा रंगमंचावर एक ऑफिस वजा घराचा दिवाणखाना  दिसतो . एखाद्या सुखवस्तू घराचा हा दर्शनी भाग वाटावा. मंचाच्या एका बाजूस बैठक , सोफा वगेरे मांडणी , तर दुसर्या बाजूस ऑफिस चे टेबल खुर्च्या . टेबल वर फोन आणि इतर कागदपत्र. ऑफिस एखाद्या उच्च पदाधिकार्याला शोभेसे असावे. मागे book rack
बैठकीच्या बाजूलाच डावीकडे  आत जायचा दरवाजा , ऑफिस च्या बाजूला उजवीकडे आणखी एक दरवाजा , ऑफिस आणि  स्टाफ करता, मागे खिडकी आणि रंगमंचाच्या मधोमध बाहेर जायचे मुख्य द्वार .
मंच प्रकाशित होतो तेव्हा ऑफिस टेबल वर ललिता फोन वर बोलत आहे.
ललिता : येस मिस्टर शिंदे, आय प्रॉमिस यू ... कार्यक्रम तुमच्या समारंभाला साजेसा होईल. आणि हो सगळी व्यवस्था चोख असेल. .... ओह येस पण तुम्ही तेव्हढ पेमेंट चं बघा... येस येस नो प्रॉब्लेम माझी सेक्रेटरी , येस प्रिया विल कॉंटॅक्ट यू... येस येस ... थॅंकयू ....( फोन ठेवते.. तेवढ्यात ऑफिस च्या बाजूच्या दाराने ललिताची सेक्रेटरी आत येते )
प्रिया : मे आय कम इन मॅम?
ललिता : येस कमिन प्रिया ....
प्रिया : मॅम , ही आजची मेल...
ललिता : anything important?
प्रिया : येस अंड नो
ललिता : व्हॉट डझ दॅट मीन ?
प्रिया : ओल्ड एज होम चे मंथली चार्जेस भरले त्याची रिसीट आहे .... बॅंक अकाऊंटमध्ये मध्ये नोंद आहेच पण आज बाय
            पोस्ट ही रिसीट आलीय.... काल त्यांचा , मावशींचा पुन्हा फोन आला होता ....
ललिता : ऑफिस च्या नंबर वर ?
प्रिया : त्या म्हणाल्या तुम्ही त्यांचा फोन घेत नाही ....
ललिता : हम्म, ओके फोन लाव ...
प्रिया : येस मॅम.... ( ललिताच्या फोन वर नंबर डायल करते ) हेल्लो.... मालती मॅम.... ललिता मॅम बोलतायत
ललिता : ( फोन घेते ) हेल्लो ... ललिता बोलत्ये ( प्रियाला जायची खुण करते ) ( ती गेल्यावर ) काय बोलायचंय?
            फोन का करत होतीस ?..... सगळं मिळतंय ना व्यवस्थित?...... माझ्याशी ? ... आता काय राहिलंय बोलायचं?
            आता तुझा माझा काय संबंध ? ..... ते होते तेव्हाच संपला ... आणि त्याला तूच कारणीभूत आहेस....
            हो.... आणि इतकं होऊनही तुला घरात ठेवायचं मी ? ..... हाकलली म्हणजे ? तू वागलीसच तशी ....
            आणि तरी मी तुला वाऱ्या वर नाही सोडली .... सगळी बडदास्त ठेवली आहे तुझी... आयतं मिळतंय ना ....
            आता त्यात समाधान मान ..... आणि हे बघ मी काही तुला तिथे भेटायला येणार नाही ... आणि तू ही पुन्हा
            पुन्हा फोन करू नकोस....( फोन ठेवते.... इंटरकॉम वर )
ललिता : प्रिया , कम इन ...
प्रिया :  ( आत येते ) येस मॅम....
ललिता : व्हॉट एल्स? एनीथंग इम्पॉर्टन्ट......? इन मेल्स?
प्रिया : not really.... पण मॅम आपल्या वेब साईट वर एक मेसेज आहे तुम्च्य्साठी...
ललिता : ओह कम ऑन प्रिया , ते सगळ तू बघ ... आय अॅम नॉट इंट्रस्टेड इन ऑल दॅट....
प्रिया : पण मॅम,  ....प्लीज तुम्ही एकदा वाचून घ्या  तो मेसेज ...प्लीज ....आय इंसिस्ट....
            ( पुढे होऊन तिला पी सी वर तो मेसेज दाखवते )
ललिता : काय तू ...ओके मी वाचते ... तोवर तू त्या शिंद्यांना कॉंटॅक्ट कर . आणि हो उद्या ते  
            देशमुख यायचे आहेत त्यांच्या इवेंट च्या डिझाईन बद्दल चर्चा करायला... आपली डिझाईनस
            तयार आहेत ना ? सगळी टीम हवीय मला तेव्हा.
प्रिया : येस मॅम.... सगळी तयारी झाली आहे ... उद्या सकाळी १० वाजता आपण प्रेझेंटेशन देणार...
            सगळे जण त्याचीच तयारी करतायत.
ललिता : गुड गुड.... रेप्युटेशन इज व्हेरी इंपॉर्टंट डियर्....
प्रिया : येस ऑफ कोर्स मॅम.....
ललिता : इतकी वर्ष मी ते सांभाळले आहे... आपल्या कंपनी चे काम म्हणजे लोकांच्या आठवणीत
            राहायला हवं ... आज आपल्यासारख्या किती तरी ऑर्गनायझेशनस हे काम करतात पण आपल्या
            या कंपनीची सर नाही कुणाला ...एकदा आपली सर्विस पाहिली कि पार्टी ने पुन्हा आपल्याकडेच यायला हवे असा
            माझा प्रयत्न असतो ... आणि  अशा तर्हेची काम करणारी आपलीच पहिली कंपनी..त्यामुळे आपल्याला
            आपली पत राखायलाच हवी.....
प्रिया : खरच आहे ते पण  मॅम, तुम्हाला ही आयडिया सुचलीच कशी?
ललिता : ओह इट्स अ लॉंग स्टोरी , सांगेन कधीतरी...
प्रिया : नेहमीचंच आहे तुमचं .... असं म्हणता आणि सांगायचं टाळता .....
ललिता : अग तसं काही विशेष नाही पण मला सुचलं हे खर ...
प्रिया : नका सांगू.... पण ही काही डिझाईनस बघून घ्या .... त्या सिंधी पार्टी च्या वेडिंग रिसेप्शन ची
            त्यांना खास गुजराती शामियाना हवाय... आणि त्यांच्या रिक्वायरमेंट ची ही लिस्ट, त्याप्रमाणे
            हे डिझाईन केले आहे... प्लस त्या अवॉर्ड सेरेमनी च्या फंक्शन चं ही डिझाईन केले आहे.... अजून
            फायनल नाही केले. तुम्ही बघून घ्या म्हणजे फायनल करता येईल ...
ललिता : प्रिया तुला हे काम छान जमले आहे... आणि तुझी टेस्ट ही इम्प्रूव्ह झाली आहे... गुड गुड
प्रिया : होणारच ना मॅम....  गेली १० वर्ष मी इथे काम करते ...
ललिता : ओह रिअली? खरच का १० वर्ष झाली?
प्रिया : येस मॅम, मॅम मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे..
ललिता : अरे मग बोल न ...
प्रिया : म्हणजे त्याचं असं आहे ...
ललिता : हम्म बोल ...
प्रिया : मला हा जॉब सोडावा लागेल...
ललिता : व्हॉट? का बर ?
प्रिया : माझे मिस्टर प्रमोशन वर इथून जाणार सो मलाही जावे लागणार ...
ललिता : ओह , हो का ?
प्रिया : मॅम, आपल्या ऑफिस मधल्या मिस गीता ला हे काम जमेल असे वाटते ... तिचे प्रमोशन ही द्यू
            आहे ...
ललिता : बघू ... पण तुला निदान २ महिन्याची नोटीस द्यावी लागेल ...
प्रिया : मॅम मी इतक्यात नाही जाणार ...  मुलांच्या परीक्षा झाल्या कि जाणार ... आणि त्याला अजून
            ४,५ महिने आहेत..
ललिता : ओह ओके ... मग ठीक आहे... मला वाटल निघालीस कि काय ...( हस्ते)
प्रिया : अशी कशी लगेच जाईन मी... मिस्टर मात्र पुढच्या महिन्यात जातील ... कालच प्रमोशन लेटर
            मिळालं ... मॅम, तुम्ही परवानगी दिलीत तर  ते बदली वर जायच्या आधी आम्ही दोघे मुलांना घेऊन ४ दिवस कुठे
            तरी जवळच रीसॉर्ट वर जायचं म्हणतोय .... या विकेंड पर्यंत त्यांना रजा ही मिळत्ये
ललिता: ओह, पुढच्या काही दिवसात जरा काम जास्त आहे ..पण काही हरकत नाही , जा तू. मी आहेच .कधी पासून रजा
            हवीय ?
प्रिया : परवा पासून ... उद्या इम्पॉर्टंट मिटींग्स आहेत .... त्या झाल्या कि गीता ला सगळं अपडेट करून जाईन मी ...
ललिता : हेच तुझं आवडतं मला ... कधी कामाची खोटी होऊ देत नाहीस...
प्रिया : मॅम, तुम्ही सुद्धा आम्हाला किती समजून घेता ....
ललिता : (हसते) बदली कुठे झालीये ?
प्रिया : औरंगाबाद...
ललिता : वाह गुड प्लेस .... पण गर्मी खूप .... इथे नागपूरची सवय आहेच म्हणा तुला ....
प्रिया : हो ते तर आहेच....
ललिता : मग आता तिथे काय करणार ?
प्रिया : नवा जॉब शोधायचा , दुसरं काय .... मॅम, प्लीज तुम्ही तो मेसेज वाचा , कोणीतरी मिस्टर अविनाश चौधरींचा
            मेसेज आहे
ललिता :  ओह ... इज इट ? येस येस ..... ( पी सी मध्ये वाचू लागते .... वाचता वाचता तिचा चेहरा गंभीर होत
            जातो...प्रिया आपले पेपर आवरता आवरता ललिता चा चेहरा बघत असते..)
प्रिया : मॅम...एक विचारू ? कोण आहेत ते ? त्यांचा मेसेज वाचून मला असं वाटलं कि तुमची इतकी जुनी ओळख आहे तर
ललिता : ( गडबडून) अं..? काय ? काही म्हणालीस?
प्रिया : ही सीम्स टू बी अॅन ओल्ड फ्रेंड...
ललिता : ओह येस .... वेरी ओल्ड फ्रेंड... २० इयर्स ओल्ड फ्रेंडशिप ...
प्रिया : ओह पण इतकी वर्ष तुमचा काहीच कॉंटॅक्ट नव्हता .... स्ट्रेंज....
ललिता : ( स्वतःतच हरवते ....पण लगेच भानावर येते ) इट हॅपन्स... लोकं त्यांच्या आयुष्यात रमतात , बिझी होतात
            चालायचंच ....
प्रिया : मॅम...एक विचारू ? तुम्ही कधी लग्न का नाही केलं? या तुमच्या फ्रेंड मुळे का ? वर यू इन लव विथ हिम?
ललिता : ओह शटप, आमच्यात तसं काही नव्हतं ....आणि डोंट आस्क मी सच सिली क्वेश्चन्स एव्हर अगेन....
प्रिया : सॉरी मॅम.....पण त्यांना काय उत्तर द्यायचं?
ललिता : काय? उत्तर ? काही लक्ष नको देऊ...
प्रिया : पण मॅम, आपण काही उत्तर नाही दिलं तर  ते आज कॉल करणार आहेत...
ललिता : काय? त्यांना आपला नंबर कसा मिळाला ?
प्रिया : आपल्या वेबसाईट वर आहे तो मॅम, एक्च्यूली हा त्यांचा तिसरा मेसेज आहे, मी आधी तुम्हाला
नव्हतंच सांगितलं पण आजचा त्यांचा मेसेज मला खूप इंटेन्स आणि पर्सनल वाटला आणि  आता ते कॉल करणार म्हंटल्यावर मला सांगावच लागलं .....
ललिता : ओके ओके .... आता त्यांचा कॉल आला कि मला ट्रान्स्फर कर ... मी बोलेन ...प्रिया एक मिनिट ....
औरंगाबाद ला जाणार म्हणतेस तर तिथे नवा जॉब शोधण्यापेक्षा आपल्या या कंपनी ला काय प्रॉस्पेक्ट्स आहेत याची चौकशी कर ..
प्रिया : मॅम ?
ललिता : अग तुझ्यासारखी एम्प्लॉयी आपली तिथली ब्रॅंच सांभाळू शकते ना?
प्रिया : म्हणजे ?
ललिता : अग वेडे आपण तिथे आपली कंपनी सुरु करू.. आणि तिथली मॅनेजमेंट तू सांभाळ .... अधून मधून मी येईनच
            पण तू एकटी हे काम सांभाळू शकशील अशी मला खात्री आहे ... सो कामाला लाग.....सगळं मार्केट सर्वे कर
            आणि बीझनेस प्रपोजल तयार कर....नव्या जागी काम करायला खूप आवडतं मला ... इथे आता सगळं रुटीन सेट
            झालंय ... इट विल बी अ गुड चेंज फॉर अस ....
प्रिया : ओके.... शुअर मॅम, थॅक्स  मॅम, मी  आत्ताच कामाला लागते.....
            ( प्रिया जाते .... ललिता विमनस्कपणे खिडकी शी जाते  आणि बाहेर बघत उभी राहते )


            काळोख
            मंच प्रकाशित होतो तेव्हा ललिता सोफ्यावर बसली आहे .... आपल्याच विचारात ....
            फोन ची रिंग वाजते तशी ललिता दचकते .... लगबगीने  टेबला पर्यंत जाऊन फोन घेते .
ललिता : हेल्लो ... ओके प्रिया .... आय विल टॉक.... येस ? ओह येस , अविनाश मी ओळखलं ... हो ..मी बरी आहे..
            तू ... तुम्ही कसे आहात ? ..... अरे नाही नाही ... मला वाटलं आता खूप मोठा माणूस झालास ... अरे तुरे
            केलेलं आवडेल .. न आवडेल ... .... कुठे असतोस ? लंडन का आणखी कुठे? ओके .. हो न खूप असेल बोलण्यासारख
            तुझ्याकडे .... हो न ... किती दिवस आहेस ? आठवडा ?... कधी भेटूया ? उद्या डिनर ? ओह नो उद्या...मी
बाहेरगावी जात्ये .....आणि किती दिवस लागतील सांगता येत नाही.....काय ? आत्ता ? ते कसं शक्य आहे? कुठून बोलतोयस तू? .... काय ?....  माझ्या ऑफिस मधूनच बोलतोयस?
            ( ललिता फोन वर बोलत असतानाच ऑफिस च्या दरवाज्यातून अविनाश आत येतो ... पाठोपाठ प्रिया येते,
            चेहऱ्यावर गोंधळ .. अविनाश ला  बघून ललिता उठून उभी राहते आणि प्रिया ला जायची खुण करते )
            अरे अविनाश what a surprise.... ये बस ..... सोफ्याकडे खुण करते ....( दोघेही सोफ्यावर सामोरा समोर
            बसतात )
अविनाश: (हसत)...... ओहो लालिता मॅडम.... गुड इव्हनिंग , तुम्ही आम्हाला टाळायचा प्रयत्न करणार हे माहित होतं मला
            पण गाठलंच कि नाही ?
ललिता : अरे काही तरी काय ? मी कशाला टाळीन तुला?
अविनाश : नाही तर काय?... मी ३ मेल्स पाठवल्या तुला .... website वर मेसेज ही पाठवले .... एकाच ही उत्तर मिळालं
            नाही मला .... याला काय म्हणायचं? इतकी बिझी आहेस का ?
ललिता : नाही रे ... बर ते जाऊ दे ... तुला कॉफी मागवू?( इंटरकॉम वर प्रियाला कॉफी आणायला सांगते )
अरे तुला कॉफी च आवडते माहित आहे मला ( तेवढ्यात प्रिया कॉफी चा ट्रे घेऊन येते )
            ही बघ आलीच कॉफी ..... एक्च्युली माझी व्हायचीच होती ...घे ...( प्रिया गेल्यावर )
अविनाश : वा  माझ्या आवडी निवडी अजून लक्षात आहेत तर ....
ललिता : हो तर ... आफ्टर ऑल वी आर ओल्ड फ्रेंड्स.....नाही का ?
अविनाश : येस ऑफकोर्स, ही कॉफी वगेरे ठीक आहे पण आज मी तुला डिनर ला नेणार आहे.... खूप बोलायचं आहे ग ...
ललिता :  बोल न मग पण डिनरला बाहेर नको , मी बाहेरचं जेवत नाही हल्ली ..आपण इथेच जेवू ना ... या बाजूला माझं
 ऑफिस आणि या बाजूला ऑफिसला लागुनच घर .. आमच्या सरलाबाई छान स्वैपाक करतात .... काय खाणार
बोल ....
अविनाश : वा वा . गुड आयडिया ..  तू काय खायला घालशील ते खाईन मी ....बाकी  छान आहे हं तुझं ऑफिस
कम घर ... या वयात असच हवं
ललिता : हो ना , बर काय  म्हणतोस ? तुझ्या बद्दल सांग बघू .... कुठे कुठे      फिरलास  ? किती वर्ष झाली .....
आपला काही संपर्क नाही..
अविनाश : ( सिरीयस होत ) संपर्क तू ठेवला नाहीस ललिता, मी मेल्स केल्या होत्या .... सतत तुझ्या संपर्कात
            राहायचा प्रयत्न केला मी... पण तुझ्याकडून नो रिसपॉन्स.....
ललिता : अरे तुझं लग्न झालं होत , नवा संसार होता .. युरोप मध्ये मस्त फिरत होतास ...माझी कशाला आठवण
            कुठे कुठे जाऊन आलास सांग तरी ....
अविनाश : ते तर आहेच.. खूप फिरलो .... युरोप , अमेरिका , जग हिडून आलो .... पण आपल्या माणसाना विसरता
            येतं का ? पण इथे येऊन बघावं तर आमची कुणीच आठवण नाही काढली. आता आलोय तर साध भेटायला
            ही तयार नाहीस...
ललिता : काय बोलतोयस ? भांडायचा मूड आहे का ?
अविनाश : भांडायचा मूड ? ओह नो नॉट एट ऑल ....गप्पांचा मूड आहे  मस्त ...
ललिता : आणि घरच्या लोकांना विसरलास का ? पुण्याला जाऊन आलास का ? कसे आहेत तुझे वडील ? ते आठवण
             काढणारच.....
अविनाश : माझे वडील २ वर्षांपूर्वी वारले ... तेव्हा येऊन गेलो मी पुण्याला
ललिता : आय अॅम सो सॉरी
अविनाश : इट्स ओके .....सो तुम्ही सांगा मॅडम.... या २० वर्षात काय काय केलंत? तुमचे डान्स क्लास बंद करून हा नवीन
उद्योगतुम्ही सुरु केलात, काय म्हणायचं ? हां हां... इव्हेंट मॅनेजमेंट नाही का ...आणि मॅडम अजूनही छान मेंटेन करून आहात .... कसं जमवलत हो ? म्हणजे मला बघा ....          साठी आल्याच्या सगळ्या खुणा आहेत पण तू
अजूनही २० वर्षांपूर्वी होतीस तशीच आहेस...
ललिता : प्लीज अविनाश , अरे माझं योग , जिम आणि बीउटी ट्रीटमेंट त्याने हे सगळं साधता येतं....
अविनाश : ओह येस ... तुम्ही बायका काय काय करत असता सौंदर्य जपण्यासाठी आणि तू तर एक डान्सर , तुला ते
            जपायलाच हवं ... नाही का ?  काय ग ? अजूनही शोज करतेस का?
ललिता : नाही रे ...आता कुठले शोज.... आता झेपत नाही दगदग ...
अविनाश : दगदग ? तुझ्याकडे बघून तर तसं अजिबात वाटत नाही ... अगदी फिट दिसत्येस आणि चक्क तरुण ही...
ललिता : ( नुसती हसते )
अविनाश : अग खरच .... नॉट जोकिंग ..... क्रेडीटेबल..... लग्न करूनही मेंटेन केलंयस ....( टाळ्या वाजवतो )
आणि नाव ही तेच लावतेस अजून ... त्यामुळेच शोधता आलं तुला नाहीतर      नाहीतर पुणे सोडून तुम्ही सगळे कुठे
 गायब झालात काही पत्ताच लागेना .. मिस्टर काय करतात ? आत आहेत का ?
 ललिता : नाही , म्हणजे मी एकटीच असते ....
अविनाश : एकटी ? का बर?
ललिता : अविनाश , आय अॅम स्टिल जोशी .....
अविनाश : म्हणजे ? ...... तू लग्न नाही केलंस ? (ललिता मानेनेच नाही म्हणते ) पण  का?( ताडकन उभा राहतो )
ललिता : ( ललिता उठून लांब जाते आणि त्याची नजर चुकवत) sorry मी या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही...
अविनाश : ऑफकोर्स... तुला याचं उत्तर द्यावच लागणार ...( ओरडतो)
ललिता : प्लीज अविनाश ,हळू बोल  ( ऑफिस च्या बाजूला बघत ) काम डाऊन .... माझं ऑफिस चालू आहे.. आत स्टाफ
            आहे.
अविनाश : ओके ओके sorry.. पण  मी तुला लग्नाचं विचारलं तर मला नाही म्हणालीस .... मला वाटलं तुझ्या आयुष्यात
            कोणी तरी आहे म्हणून तू मला नकार दिलास .....
ललिता : अविनाश २० वर्षं झाली त्या गोष्टीला .... आता काय त्याचं?
अविनाश : पण मग मला तू नकार का दिलास ?
ललिता : sorry मी या प्रश्नाचं ही उत्तर द्यायला बांधील नाही...
अविनाश : बरोबर आहे ..बंधनं नको न...ती कधीच नकोच होती तुला..
ललिता : अविनाश आपण भांडतच बसणार आहोत का? आणि मी नकार दिल्याने तुझं काय अडलं? लग्न करून २० वर्ष
            सुखाचा संसार झाला ना? आता या सर्व गोष्टीना काय अर्थ आहे.... ? हे बघ शांत हो .... बस इथे ...
            बर तुझ्या बायको बद्दल सांग ... मुलांबद्दल सांग .. किती मोठी आहेत ? त्यांना पण आणलंयस का ?
अविनाश : ( उठून खिडकीशी उभा राहतो ... प्रेक्षकांकडे पाठ करून.. ललिता उठून जवळ जाऊ लागते पण लांबूनच )
ललिता : मी काय विचारते अविनाश ? काही सांगशील त्यांच्या बद्दल ?
अविनाश : ( सिरीयस होत ) कुणाबद्दल सांगू?
ललिता : अरे तुझ्या बायको मुलांबद्दल ....
अविनाश : लग्न मी देखील केलं नाही ललिता ......
ललिता : काय?.... पण तुझ्या लग्नाची पत्रिका पाठवली होतीस मला ...
अविनाश : इमेल ने पाठवली होती ......तुझा विश्वास बसला ?... खोट होत ते .... तुझा निर्णय बदलावा म्हणून...
ललिता : अरे पण ....आय कांट बिलीव्ह इट.......
अविनाश : मग काय करणार होतो मी? तू , तुझे वडील , माझं काही ऐकूनही घ्यायला तयार नव्हतात ....मला भेटायला  ही तू तयार नव्हतीस  आणि आश्चर्य म्हणजे १५ दिवसात तडका फडकी तुम्ही पुणे सोडून निघून गेलात ...आपली
            मैत्री , आपल्यात निर्माण झालेली आपुलकी सगळं काही किती सहज विसरलीस ..... .
किती शोधलं मी तुम्हाला , पण कुणालाच काही माहित नव्हतं .... मग मी माझी खोटीच लग्न पत्रिका तयार करून तुला मेल केली ... पण साधी मेल मिळाल्याची पोच देखील दिली नाहीस मला...
ललिता : काय उत्तर अपेक्षित होतं तुला माझ्याकडून ? लग्न ठरल्याबद्दल अभिनंदन ? का वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा ?
            त्या तर कायम होत्याच ना?
अविनाश : यावर काय म्हणू ? बर तुझे वडील आणि त्या कोण होत्या तुमच्याकडे तुझ्या मावशी त्यांनीही किती
            अपमानास्पद वागावं माझ्याशी .... घरी भेटायला आलो तर माझं काहीच ऐकून न घेता घराबाहेर काढलं मला  
            तेव्हा ही तुला काही वाटलं नाही ....
ललिता : ( त्याच्या नजरेला नजर न देता बसून राहते ... मधेच प्रिया ला इंटरकॉम वर आत यायला सांगते ...ती आत
            आल्यावर ) प्रिया स्टाफ ला जायला सांग ... मी जरा बिझी आहे ... आणि उद्या लवकर यायला सांग
प्रिया : ओके मॅम... ( प्रिया निघून जाते )
अविनाश : तुझे वडील खूप मोठी व्यक्ती ..आय अॅक्सेप्ट .... पण  अग साध्या शिष्टाचाराची पण लायकी नव्हती का
            माझी? तुझे वडील मोठे सायंटिस्ट ना .... अरे पण मुलीनी कोणाशी मैत्री करावी हे ते कोण ठरवणार ? आणि
            अठराव्या शतकात असल्याप्रमाणे त्याचं वागणं ... अजबच !
ललिता : हे बघ  तसं काही नव्हतं ...
अविनाश : मग कसं होतं? तूच सांग .... आपल्या लग्नाला त्यांचा विरोध होता म्हणूनच तू मला नकार दिलास ना ?
            माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा तू चाळीशीची होतीस ... मग तुझ्या लग्नाबाबत निर्णय घ्यायचा हक्क तुला नसावा ?
ललिता : नाही अविनाश तसं अजिबात नाही ....
अविनाश : मग ? तूच सांग कसं होतं ते ....का तुझं डान्स चं करियर , त्यानिमित्ताने भेटणारे श्रीमंत , देखणे तरुण
            हे सगळं सोडून लग्नाच्या बंधनात बांधून घेणं जड जात होतं तुला ?
ललिता : स्टॉप इट अविनाश .... मी तशी स्त्री वाटले का तुला ?
अविनाश : मग मला का नाकारलस ललिता ?
ललिता : आता काय त्याच ?
अविनाश : नाही कसं ? माझ्या आयुष्याची वाट का लावलीस हे जाणून घ्यायचा हक्क आहे मला ...
ललिता : प्लीज असं म्हणू नकोस ... मी तुझ्या आयुष्याची वाट नाही लावली उलट तुला तुझं आयुष्य मोकळेपणी
            जगायची संधी दिली. चांगलं लग्न करून छान आयुष्य जगता आलं असत तुला ...
अविनाश : वा.... किती मोठ मन आहे तुझं ?
ललिता : मला वाटतं हा विषय आपण इथेच संपवावा ... यातून  काहीही निष्पन्न होणार नाही..
अविनाश : नो नो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय ... बास...
ललिता : ( डोक्याला हात लावून बसते)
अविनाश : फॉर गॉडस् सेक से समथिंग.....
ललिता : आय हॅव नथिंग टु से .....
अविनाश : नो नो हे चालणार नाही ... बोल ललिता काही तरी बोल...इतकी वर्ष या प्रश्नाचं उत्तर शोधतोय मी...
ललिता : मी फक्त एवढच सांगीन कि आपलं लग्न होणं शक्य नव्हतं ...
अविनाश : पण का ? तेच तर विचारतोय मी ...
ललिता : ( गप्प)
अविनाश : आता तुला सांगायला काय हरकत आहे ? तुझे वडील आत आहेत का ? का तुझी मावशी ? ( आत डोकावतो)
ललिता : आत कुणीही नाही ... ते दोघेही नाहीत
अविनाश : ओह . वडील ? वारले का ते  ? आय अॅम सो सॉरी
ललिता : हो मिस्टर जोशी , द ग्रेट सायंटिस्ट ५ वर्षांपूर्वी वयाच्या नव्वदाव्या वर्षी हार्ट फेल होऊन वारले ...
अविनाश : टेक इट इझी बेबी ... ते वडील होते तुझे ...
ललिता : असं तुला वाटतं ...
अविनाश : ते तुझे वडील नव्हते? मग काका होते का ?
ललिता : जाऊ दे ....
अविनाश : आणि तुझी मावशी ? त्या इथे नसतात का ?
ललिता : नाही ..
अविनाश : कुठे गेल्या त्या ?
ललिता : ओल्ड एज होम ....
अविनाश : ललिता , व्हॉट्स रॉंग विथ यू ? नेव्हर माइंड .... पण मग आता तरी सांगशील का खरं काय ते?
ललिता : काय सांगू?
अविनाश : मला नकार द्यायचं कारण ...
ललिता : मी सांगितलं न ..आपलं लग्न अशक्य होतं ...
अविनाश : मला कारण हवंय ... आय इंसिस्ट..
ललिता : कारण? ओके  , मग ऐक , अविनाश , आय वॉज ऑलरेडी मॅरीड...
अविनाश : व्हॉट ..? ऑलरेडी मॅरीड...?
( अवाक ...गप्प ) मॅरीड टू हूम ललिता ?
ललिता : ( खिडकीशी जाऊन बाहेर बघत राहते )
अविनाश :आपण भेटत होतो तेव्हा तुझं नवरा कुठे होता ? इथेच?
ललिता : ( मानेनेच हो म्हणते )
अविनाश : इथे ? डू आय नो हिम ? मी भेटलोय त्याला ?
ललिता : व्हॉट डज इट मॅटर नाऊ ?
अविनाश : ओह येस इट मॅटर्स..... कमॉन टेल मी हिज नेम.... आय वॉंट टू नो....
ललिता : प्लीज ... अविनाश ...
अविनाश : प्लीज टेल मी ललिता ...
ललिता : ओके ओके .... मिस्टर नामदेव जोशी .... द ग्रेट सायंटिस्ट...
अविनाश : व्हॉट?...... आर यू आऊट ऑफ योर माइंड?..... तुला वेड लागलंय ललिता .....
ललिता : येस मला वेड लागलंय ..
अविनाश : नो ,नो
ललिता : येस , अविनाश , इट्स ट्रू
अविनाश : नो , इट कांट बी ..... यू आर मॅड....
ललिता : येस आय अॅम मॅड ,  मला वेड लागलंय ...कधीच लागलंय  ..मी वेडी झाले आहे ... ( जोर जोरात हसू लागते आणि
            हसता हसता रडू लागते ......तिचं हे हसणं रडणं बघत अविनाश सुन्न होऊन जातो )


काळोख


( मंच प्रकाशित होतो तेव्हा अविनाश आणि ललिता शांतपणे बसले आहेत..)
अविनाश : हे खरं आहे का ललिता ? पण वयाचं इतकं अंतर असताना तू हे लग्न का केलंस ?
ललिता : लग्न केलं तेव्हा आमच्या वयात ५ च वर्षाच अंतर होतं ...
अविनाश : व्हॉट आर यू सेइंग? पण मग ते तुझ्या दुप्पट वयाचे दिसत ...
ललिता : ते दुप्पट वयाचे नव्हते तर मी अर्ध्या वयाची दिसत होते ....
 अविनाश : तू हे घे , पाणी पी आणि नीट विचार करून सांग .....
ललिता :खर तेच सांगते आहे . एका अति प्रतिभावान वैज्ञानिकाची मी पत्नी आहे.......आणि त्याच्या अति
            महत्वाकांक्षी प्रयोगाची बळी आहे मी
अविनाश : बळी ? प्रयोग ? कसला प्रयोग ?
ललिता : त्यांना माणसाला म्हातारपणाच्या शापातून मुक्त करायचं होतं ....माणूस म्हातारा च झाला नाही तर तो
            अधिक कार्यक्षम होईल आणि आयुष्यात खूप काही अचिव्ह करेल असं त्याचं मत होतं ...
अविनाश : मग ?
ललिता : मी एक डान्सर, मुलं झाली त्या काळात १० एक वर्ष मला माझे करियर विसरावे लागले होते ....आणि मी
            मला घरात गुदमरायला होत होतं ..... एव्हाना माझी पस्तीशी उलटली होती .... थोड्याच दिवसात
            माझा डान्स बंदच पडणार होता ..... मला सिनेमातून ही ऑफर्स येत होत्या ... ते सगळं सगळं विसरावं लागणार
            होतं ...
अविनाश : ( पूर्ण गोंधळलेला चेहरा )
ललिता : मग एक दिवस मला त्यांच्या या प्रयोगाविषयी कळल ... जणू माझ्यासाठीच त्यांना ही कल्पना सुचली ...
            मला त्यांनी ते औषध मला द्यावं असं वाटत होतं ....
अविनाश : मग ? त्यांनी तुझ्यावर तो प्रयोग केला असं म्हणायचं आहे का तुला ?
ललिता : हो मग काय ....
अविनाश : आणि मग ?
ललिता : अरे , मला त्यांनी ट्रीटमेंट दिली .  सोबत पथ्य होते  आणि जोडीला व्यवस्थित व्यायाम  यामुळे माझ्यात
            विलक्षण असा फरक पडत गेला ... नव तारुण्यच मला मिळालं ....
अविनाश : तुझ्या आधी आणखी कोणावर हा प्रयोग केला त्यांनी?
ललिता : अरे त्यांना त्यांचा हा प्रयोग यशस्वी करून दाखवायचा होता त्यांच्या सायंस फ्रॅटरनिटी मध्ये ... ही वॉंटेड
            टू प्रूव्ह हिज थ्योरी...त्यामुळे पहिली मीच ...
अविनाश : व्हॉट ,दॅट मीन्स इट वॉज अनऑफ़ीशीयल....
अग पण तुला त्यांचा हा प्रयोग स्वतःवर करून घ्यायची  काय गरज होती ?
ललिता ; त्यांना प्रयोगासाठी मानवी शरीर हवं होतं आणि   तसं ते त्यांना मिळत नव्हतं..
अविनाश : म्हणून स्वतःच्या बायकोवर असला जीवघेणा प्रयोग केला त्या माणसाने ? आणि तू तो त्यांना करू
 दिलास ? वाह.....शाब्बास...
ललिता : हो कारण या प्रयोगामुळे मला चिरतारुण्य मिळणार होतं .....
अविनाश : अॅट व्हॉट कॉस्ट ?  अग हे किती रिस्की होतं .. कळतंय का ? तुझ्या जीवाचं काही बर वाईट झालं असत तर ?
ललिता : माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता ... आणि बघ मला काही झालं का ? उलट चिरतारुण्य मिळालं मला ..
अविनाश : पण तू केव्हढा मोठा धोका पत्करलास तुला कळतंय का ? तू लुळी पांगळी झाली असतीस ....तुझा एखादा
अवयव निकामी झालं असता ... अग एव्हढंच काय तुझ्या मेंदूत बिघाड झाला असता ... काहीही होऊ शकलं असत.. माय गॉड, इट्स टेरीबल....( शांत बसलेल्या ललिताला ) काही कळतंय का तुला .....
ललिता : हो कळतंय ते मला , पण खूप उशीरा कळतय... ( थोडा वेल शांतता )
आमच्याकडे भेटलास ती मालती ... ती माझी सक्खी धाकटी बहिण . ती ही विज्ञान शाखेतली पदवीधर ...
ती जोशींना मदत करत असे त्यांच्या प्रयोगांमध्ये ...मदत करता करता... माझे शारीरिक वय वाढायचे थांबले ...माझ्याहून ५ वर्ष मोठ्या जोशींनी साठी गाठली पण मी चाळीशिचीच राहिले ...
माझी धाकटी बहिण माझ्याहून मोठी दिसू लागली ... माझी मुलं माझ्या बरोबरीची दिसू लागली ...
पण मी तेव्हढीच राहिले.....
अविनाश : माय गॉड...हॉरिबल
ललिता : माझ्या ह्या न वाढणाऱ्या वयामुळे शेजारी पाजारी कुजबुज होऊ लागली कि आम्ही राहण्याचे ठिकाण बदलत
            असू ... सांगली , कोल्हापूर , पुणे, नाशिक आणि आता हे नागपूर... सगळीकडेच माझ्या रुपामुळे अनेक तरुण माझे
            मित्र होऊ पाहत .... यावरून माझी बहिण मालती मला नेहमीच टोमणे मारत असे ...आणि मग जोशी माझ्यावर
            संशय घेत ....
अविनाश : ( अस्वस्थ) अनबिलीव्हबल
ललिता :मिस्टर जोशींचे वय वाढू लागले तसे ते नैसर्गिकरीत्या वृद्ध आणि दुर्बल होऊ लागले आणि मी मात्र तारुण्य
सुलभ उत्साहाने भरलेली होते. नवऱ्याकडून माझ्या अपेक्षा तशाच राहिल्या पण जोशींना आता माझ्या अपेक्षा
पूर्ण करता येईना ... त्यात ते खूप संशयी बनत गेले ... आमच्या मध्ये  दुरावा निर्माण होऊ लागला ...
माझ्या पेक्षा मोठी दिसत जाणारी माझी धाकटी बहिण त्यांना जास्त जवळची वाटू लागली. त्यांना माझ्या
 पेक्षा तिची च येता जाता  गरज लागू लागली ...
            मी माझ्या डान्स क्लास आणि शोज मध्ये बिझी असताना मालतीने मिस्टर जोशींशी सूत जमवले ...
बाहेर कुठेही माझ्या ऐवजी ते तिला बरोबर नेत ... आणि खुशाल बायको म्हणून तिची ओळख करून देत... तुझ्याप्रमाणेच लोक मला त्यांची मुलगीच समजू लागले... त्यांना त्याचं काहीच वाटत नसे . पण एखाद्या सायन्स सेमिनारलाही ते बायको म्हणून मालतीला नेऊ लागल्यावर मात्र मला ते सहन होईना....
अविनाश : इट्स वियर्ड... तुमची  मुलं ?
ललिता : आम्हाला २ मुलं ... मोठा दीपक आणि धाकटी आर्या .... दीपक इंजिनिअर झाला आणि आर्या फॅशन डिझायनर..
शिक्षणाच्या निमित्ताने दोघेही अमेरिकेला गेली... खरं तर माझं हे यंग दिसणं त्यांना खटकत होतं. मला तेव्हा ते कळूनही मी त्याकडे कायम दुर्लक्ष केलं....
आमची मुलं अमेरिकेत जी गेली ती परत यायचं नावच घेईना . त्यांनी तिथेच लग्न केली ... आम्हाला सांगितलं ही नाही ...खरं तर त्यांना माझी लाज वाटू लागली होती ..मला जेव्हा हे खऱ्या अर्थाने समजलं , तेव्हाच मला माझ हे रूप आणि तारुण्य खुपू लागलं .....मी माझं नवरा तर गमावलाच होता  , मुलं  ही गमावली आणि मग तुझ्यासारखा चांगला मित्र ही गमावला ...
अविनाश : ललिता ...
ललिता : तुला वाटणारे माझ्या विषयीचे आकर्षण जसे वाढू लागले तसे आम्ही सावध झालो .. आणि मग           
            तू मला लग्नाचे विचारताच आम्ही पुण्याहून आमचा मुक्काम नाशिक ला  हलवला ....
( थोडा वेळ शांतता )
अविनाश : पण मग या प्रयोगावर उतारा असेलच न .... antidote .... ? तो घ्यायचा , सगळे प्रश्न सुटले असते ...
ललिता : नाही ... यावर उतारा ... antidote नाही ,
अविनाश : नाही ? यावर उतारा नसताना त्या माणसांनी हा प्रयोग केलाच कसा ? इट्स अ क्रिमिनल ऑफेंस
ललिता : ते ही माझ्या खूप उशीरा लक्षात आलं... मुळात मी कधीच म्हातारी होणार नाही या कल्पनेने हुरळून गेले
होते......त्यानाही आपला  प्रयोग करून बघायची घाई झाली होती.. antidote काय पुढे मागे बनवता येईल ... त्यावेळेस माझे वय वाढायचे थांबवणे जास्त महत्वाचे वाटले ... माझे वय वाढायचे थांबले तसे ते पुन्हा वाढूच नये असेचं मला वाटत राहिले आणि मग त्या उताऱ्याची  गरज मला कधीच वाटली नाही
अविनाश: आर यू मॅड ?
ललिता : अॅबसोल्यूटली, अरे डान्सर व्हायचं होतं मला .... सिनेमात हिरौईन व्हायचं होतं .... मग हे केव्हढ
            मोठं आमिष होतं .... मी फसले रे ... पुरती फसले ....
अविनाश : मुलांना माहित आहे हे सगळं?
ललिता : हो तर, ते किती मागे लागले होते जोशींच्या, उतारा बनवा म्हणून , पण म्हातारा माझी तडफड तडफड
            व्हावी म्हणून उतारा न बनवताच मेला .....
अविनाश : पण मग त्या मावशी सॉरी, मालती तुझी बहिण तिने काही प्रयत्न केला का ?
ललिता : काय माहित ? पण मिस्टर जोशी गेल्यावर मी तिला घराबाहेर काढले ....
अविनाश : ललिता ....
ललिता : हो... तिने माझ्या संसाराला सुरुंग लावला .... मला हा प्रयोग स्वतःवर करून घेण्यास भरीस पाडलं...
            तिने तरी यातले धोके मला समजावून सांगायला हवे होते न ? पण नाही .... ती फक्त मजा बघत राहिली .
            घराबाहेर काढले म्हणजे रस्त्यावर नाही सोडली तिला ... एका वृद्धाश्रमात तिची रवानगी केली ...
अविनाश : तू पोलिसात तक्रार करायला हवी होतीस...
ललिता : अरे त्यांनी माझी ना हरकत दाखल्यावर सही घेतली होती ... माझ्या नकळत ... मालतीचेच कारस्थान
अविनाश : ( डोक्याला हात लावून बसतो)....आता तुझी मुलं कुठे आहेत ? इथे एकटी राहण्यापेक्षा त्यांच्याकडे जाऊन राहा
ललिता : अरे ती देखील साठी ची झाली आहेत .... त्यांना आता या वयात कसली ही जवाबदारी नकोय ...आणि मी कोण
            म्हणून सांगणार ते लोकांना ? त्यांची आई? जी अजूनही चाळीशीची ही दिसत नाही....
            आणि मला विसा तरी कसा मिळणार रे ....आय डोंट लुक माय एज   ...आय शूड बी डेड...बट हियर आय अॅम
            अॅट 90 फिट अॅंड फाईन.....जगते आहे... मरणाची वाट बघत .....
अविनाश : ललिता .... असं का बोलतेस ?
ललिता : मग काय बोलू ?  जीव जात नाही तोवर जगणे एव्हढंच उरलंय हातात .... निसर्गाशी खेळ केल्यावर दुसरं काय
            होणार ? शिक्षा तर मिळणारच न... मी इतकी भेकड आहे कि मला माझा जीव ही देता येत नाही... माझ्या
            आयुष्याच एक नाटकच होऊन बसलंय .. या  नाटकाचा हा अंक , हा दीर्घांक ........कधी संपणार ?
याची वाट बघत जगते आहे....


           

            ,







No comments:

Post a Comment